गडचिरोली- अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयामागील परिसरात राहणाऱ्या महिलेची तिच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.निर्मला चंद्रकांत आत्राम (४९) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मुलगी आणि तिचा प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
उर्मिला हिचे मागील ४ वर्षांपासून रूपेश येनगंधलवार (२३) या युवकासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. वडील नसल्याने मुलगी उर्मिलाचा सांभाळ आईनेच केला.
प्रियकराच्या मदतीने गुरुवारी रात्री ११ वाजता आईचा टॉवेलने गळा आवळून हत्या केल्या नंतर ते बाइकने जात असतांना गस्तीवरिल पोलिसांनी त्यांना थांबाविल्या नंतर संपूर्ण घटना उघडकीस आली.
उर्मिलाचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २००० मध्ये अर्कापल्ली गावात त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेथून पाचव्या दिवशी उर्मिलाचा जन्म झाला. तेव्हापासून उर्मिलाचे पालनपोषण आईनेच केले होते. आई निर्मला प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात मानधन तत्त्वावर कार्यरत होती… जन्मापासून वडिलांचे छत्र हरपलेल्या आपल्या मुलीचा सांभाळ त्यांनी खूप कष्टाने केला होता. भविष्यात वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती; पण क्षुल्लक कारणातून जन्मदात्या आईची हत्या केल्याने तिला गजाआड जावे लागले.