यावल : यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढवले आहे.
डांभूर्णी, ता.यावल येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच संशयीत निलेश काशीनाथ कुंभार या तरुणाने फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी अल्पयीन मुलगी यावल पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने संशयीत निलेश कुंभार याने गुजरात राज्यातील सुरत येथे नेत अत्याचार केल्याची माहिती दिली तसेच त्यानंतर बुधवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ सोडून पळ काढल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले.
हे पण वाचा :
ना. महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती, नेमक काय घडले सभागृहात?
खात्यात पैसे नाहीत, तरीही तुम्ही काढू शकता 10,000 रुपये! कसे ते जाणून घ्या
भाजप संसदीय मंडळाची घोषणा ; समितीतून महाराष्ट्र हद्दपार, यांच्या नावाचा समावेश
खळबळजनक ! पत्रकाराने केली तरुणीची हत्या, पोलीस स्टेशन गाठून दिली खुनाची कबुली
अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल कल्याण समिती, जळगाव येथे पाठवण्यात आले. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश कुंभार याचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.