धरणगाव । चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रदीप पाटील (वय-२३) आणि किशोर पाटील (वय-३१) असे अपघातातील मृत तरुणांचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
नेमकी काय आहे घटना?
धरणगाव शहरातील संजय नगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील व किशोर पाटील हे दोघं आज कामानिमित्त चोपडा येथे गेलेले होते. दुपारी चोपड्याहून परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीचा (एमएच १९ सीएच ३८९४) अपघात झाला.
हे पण वाचा..
..आता पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्ह्याचा विकास करा ; एकनाथ खडसे
ईशा गुप्ताने केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड Video शेअर
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे भाव आणखी घसरणार
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, भाजपशी युती तोडण्याचा जेडीयूचा निर्णय
हा अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे धरणगावात हळहळ व्यक्त होत आहे.