Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ? 

najarkaid live by najarkaid live
June 12, 2019
in सामाजिक
4
आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ? 
ADVERTISEMENT
Spread the love

    भारत हा कधी काळी कृषीप्रधान देश होता.या देशातील शेतजमीन सुजलाम सुपलम होती. ती सोन्यासारखे अन्न धान्य पिकवीत होती.तिच्यावर शेतकरी, शेतमजूर शेठ,सावकार बारा बुलतेदार गुण्यागोविंदाने नादात होती.जात,धर्म आणि तेहतीस कोटी देव देविका तेव्हा सुद्धा होत्या.पाप,पुण्याच्या व स्वर्ग नरकाच्या भितीमुळे कोणी कोणाला नाहक त्रास देत नव्हता.देवा धर्माची थोडया भीतीने लोक नितीमत्तेने वागत होती. गावांतील वडीलधाऱ्याचा धाक होता सर्वात मोठे म्हणजे लोक काय म्हणतील?.समाज काय म्हणेल ?.या भीतीमुळे अन्याय अत्याचारांचे प्रमाण कमी होत होते.लेखी कोणत्याही व्यवहार नव्हता.शब्दाला मोठी किंमत होती. आता शेतमजुर,शेतकाऱ्या वरील अन्याय,अत्याचार आणि आर्थिक शोषण मोठया प्रमाणात वाढलेले आहे. शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलंमुली ग्रामसेवक ते सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी असतांना. ग्रामीण भागात, कृषिउत्पन्न बाजार समितीत कोण कर्मचारी अधिकारी असतात?. कारण आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो?.
शेतकरी, शेतमजुरांची मुलं चावडीवर सर्व लोक रात्री एकत्र बसुन गांवगप्पा गप्पागोष्टी करीत होती. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की मातीच्या घरात राहीलो.आणि आकाशातील परी, राजा राणीच्या गोष्टी जमिनीवर बसून ऎकल्या आहेत.शेणाने सारवलेल्या जमीन बसून जेवत होतो व ताटली भर चहा पित होतो.
आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की लहानपणी गल्लीत बोळात, गोठणावर मित्राबरोबर विट्टीदांडू, लपाछुपी, खो-खो, कबड्डी, भोवरा, गोटया कुस्त्या सारखे खेळ खेळलो.
आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की सार्वजनिक पोलखाली पिवळ्या कमी उजेडाच्या बल्बच्या प्रकाशात अभ्यास केला आहे आणि पुस्तके वाचली आहेत.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की पंधरा पैसाचे पत्र लिहून पोस्टाने निरोपाचे आदान प्रदान करत होतो.सुखा दुःखाच्या आनंदाच्या गोष्टी सांगत होतो. आठवडी बाजार मध्ये गावोगावी फिरणारा बुलतेदार निरोपाची घेवाण देवाण करीत होता. आम्ही ती शेवटीची पीढ़ी आहोत की कूलर, एसी न वापरता नदीत पोहलो, रात्री मैदानात उगड्यावर झोपलो, हीटर न वापरता बालपणी चुलीवर पाणी गरम करून अंगोळ करीत असो. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की डोक्याच्या बारीक केसांना खोबरेतेल लावून शाळेत आणि जात असू. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की शाईवाला फाॅऊन्टन पेन आणि दौउत याने वह्या लिहल्या आहेत.हात शाईने काळेनिळे केले आहेत.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की शिक्षकाचा मार खाल्ला आहे.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की मोठ्याचा आदर करत होतो,त्यांना बघून आदराने भितीने पळून जात असू, आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की आपल्या शाळेचे पांढरे शुजवर पांढऱ्या खडूची पेस्ट लावून ते चमकदार करत असु आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की दाढी साठी लाईफबाय साबण वापरत होतो, नेहमी गुळाचा चहा पित होतो. सकाळी उठल्यावर काळे किंवा लाल दंत मंजन किंवा मिश्री लावत होतो. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की रात्रीच्या चांदण्यात रेडियोवर BBC च्या बातम्या, विविध भारती,
ऑल इंडिया रेडियो अणि बिनाका गीतमाला प्रोग्राम नेहमी ऎकत होतो. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की उन्हाळ्यात रात्र होताच छतावर पाण्याचा शिडकावा करत होतो,त्यानंतर सतरंजी अंथरुन झोपत होतो.तसेच एक स्टैंड वाला पंखा सगळ्याकडे असे. सकाळी सूर्योदय होताच उठत असो.
आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की एकमेकां विषयी सर्वाना आदर होता.फार चांगली नाती जपत होती, ती आता कमी झाली आहे, सर्व मोबाईल मध्ये डोकावलेली आहेत. आज फार शिकलेले लोक आहेत. पण ते मतलबी, स्वार्थी, अनिश्चितता, एकटेपण व निराशेत जात आहेत.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की नात्याच्या, प्रेमाचा गोडपणा जपला आहे, अनुभवला ही आहे. आम्ही खरचं नशीबवान आहोत. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की ज्यांनी आपल्या आईवडिलांचे नेहमी ऎकले आणि मुलांमुलीचे ही ऎकत होतो.
विशेष म्हणजे १५ पैशाचं  पोस्ट कार्ड खुशाली कळवत होतं, लाल शाईने अर्धं लिहिलेलं कार्ड रडायला लावत होतं. एक रुपया सुट्टा घेऊन एसटीडीच्या लाईनमध्ये उभा रहात होतो फोन लागला की..मन भरुन येत होतं. whatsapp वर आता २४ तास संपर्कात राहातोय. ना कोणाला ती ओढ आहे?.ना कोणाला ती हुरहुर आहे?. काळ बदलला बदलली साधनेत आम्ही अजूनही जिव्हाळा शोधतच आहोत. तेव्हा गांवातील लोक एकमेकांना आदराने विचारपूस करीत होती. त्यात जिव्हाळा होता.आता तो कुठेही जाणवत नाही. म्हणूनच १५ / २० हजाराच्या मोबाईलला १५ पैशाच्या पोस्ट कॉर्डची सर येत नाही.नात्याची तर नाहीच नाही,अजून काय काय बदलेल?. पण ते दिवस?. ती माया?. ती आपुलकी?. पुन्हा कधीच मिळणार नाही. जागतिक टपाल दिना निमित्ताने विविध सोशल मिडिया वरील ग्रुपवर आलेल्या हया पोस्टचे संकलन आहे.प्रत्येक जन हे म्हणतो आवडले तर पुढे पाठवा.खरेच आहे आठवणी प्रत्येकाच्या जाग्या होतात,पण ते ऐकून घेणारे समोर नसेल तर सांगणार कोणाला?. म्हणूनच सोशल मिडिया हा उत्तम पर्याय आज प्रत्येकाला उपलब्ध आहे. प्रत्येकांनी आपल्या शाळा, कॉलेज मधील आठवणी जाग्या कराव्यात.
   गावांत एकत्र शिक्षण घेतांना कधी जात आडवी येत नाही. कॉलेज मध्ये एकत्र शिक्षण घेतांना जात आडवी येत नाही.पण शिक्षण घेतांना अडचणीच्या वेळी जेव्हा जातीमुळे आर्थिक मदत मिळते तेव्हा मात्र मुलांच्या मनातील जाती बद्दल तीव्र संवेदनां जाग्या होतात.तेव्हा आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे कोणी विसरत नाही.पण जे शेतमजूरांचे नव्हे तर सधन शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत म्हणून आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत मिळत नाही. हे काही मुलामुलींना पचविणे अशक्य जाते.तेव्हा शाळा,कॉलेज मध्ये एकत्र शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना स्वतःच्या जातीचा गर्व वाटतो दुसऱ्या जातीचा तिरस्कार त्यातुनच मेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलीत सुद्धा डॉ पायल तडवी सारखी मुलगी आत्महत्या करण्यासाठी मजबूर होते. खेड्यातील मुलगी,प्राथमिक शाळा ते कॉलेज करून इथं पर्यत पोचते तेव्हा तिला कितीतरी आठवणी पाठलाग करीत असतात. तेव्हा ती म्हणते आम्ही शेतमजूरांची मुलगी आहे हे विसरलो नाही.
कॉलेज मध्ये गेल्यावर मुलामुलींना वेगळ्या जगात आल्या सारखे वाटते.तिथे अज्ञाना पेक्षा विज्ञान सर्व श्रेष्ठ आहे हे समजते,जात,धर्म,प्रांत सीमारेषा पुसट होतात.धर्म संस्कार, सांस्कृतिक रितीरिवाज यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. तेव्हाच भारतीय जागरूक नागरिक बनण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेतले पाहिजे.आमचे आईवडील शेतकरी, शेतमजूर होते आम्ही शेतकरी, शेतमजूर बनण्यासाठी शिक्षण घेत नाही. तर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, बँक मॅनेजर, बिजनेस मॅन,आय पी एस,आय ए एस उच्चशिक्षित उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी शिक्षण घेत आहोत तेव्हा आम्ही जात,धर्म,प्रांत,भाषा सर्व विसरलो पाहिजे.
गेल्या वीस पंचवीस वर्षात हे सर्व हे शिक्षण घेतांनाच विसरून चालणार नाही यांची जाणीवपूर्वक तयारी करून घेतली जाते. त्यामुळेच सरकारी निमसरकारी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्तव्ये दक्ष न राहता आपली ओळख जातीला घेऊन पुढे येत आहे. पूर्वी सर्व शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयात नमस्काराने सुरुवात होत होती.आता त्यात तुकडे पडलेत. आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो नाही म्हणणारे खुप कमी भेटतात.तसेच आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत हे विसरलो नाही हे सांगणारे पुढे येत नाही.शेतमजुरावर अन्याय करतांना जात पाहिली जाते.शेतकऱ्यांना तरी कुठे न्याय मिळवून दिला जातो. शेतकऱ्यांची,शेतमजुरांची मुलंमुली ग्रामसेवक ते सचिवालय पर्यत पोचली त्यांना आज जाणीव आहे काय की आम्ही 
शेतकऱ्यांची ,शेतमजुरांची मुलंमुली आहोत म्हणून ?.
आम्ही  शेतमजूरांची मुले आहोत हे ते विसरले नाहीत काय?. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक, वकिलाचा मुलगा वकील,खासदारांचा मुलगा मुलगी आमदार,आमदारांचा मुलगा,मुलगी नगरसेवक, नंतर आमदार असा बदल होत असतांना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलामुलींनी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी म्हणून पुढे आले पाहिजे.तरच हा कृषिप्रधान देश बनविता येईल.आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ?. नाही असे वागले पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप, मुंबई 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन

Next Post

भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार -दिलीप वाघ 

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार -दिलीप वाघ 

भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार -दिलीप वाघ 

Comments 4

  1. सागर रामभाऊ तायडे says:
    6 years ago

    माननीय संपादक प्रविण सकपाळ दैनिक नजरकैद नमस्कार जयभिम आज दुपारी आपण माझा आम्ही शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुले आहोत हे विसरलो ?.लेख नेटवर टाकल्या मुळे जलगं,मुक्ताईनगर, चाळीसगाव येथुन अभिनंदन करणारे कॉल आले करीत त्यांचे खरे अभिनंदनास आपण प्रात्र आहेत म्हणून त्यांना ऑनलाइन प्रतिक्रिया व अभिनंदन करण्यास सांगितले.तरी मी आपले संपादक व संपादकीय मंडळाचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद

  2. ऍड सौरभ इंगळे says:
    6 years ago

    अप्रतिम लेख सर

  3. Satish Tayade says:
    6 years ago

    Nice post

  4. Supriya Surve says:
    6 years ago

    खरंच खूप छान आणि सुंदर शब्दात वर्णन केलं आहे….अगदी जुन्या गोष्टींची आठवण झाली….खरंच कोणीही विसरू नये आपण काय होतो आणि आहोत……. परिस्थितीची जाणीव सर्वांना असावी….

    अभिनंदन….ह्या लेख लिहिल्या बद्दल

ताज्या बातम्या

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Load More
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us