भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका विवाहीत महिलेनं आत्महत्या केली. या महिलेच्या हातावरच सुसाईड नोट लिहिलेल्याचं आढळून आलं आहे. मी माझ्या मर्जीने जीव देतेय, असं या महिलेनं हातावर लिहिल्याच आढळून आलं. मात्र या विवाहितेच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप केला आहे. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता पुढील तपास केला जातो आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजलीये.
भोपाळच्या सुभाष साहू यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी इंदूचा विवाह झाला होता. इंदू एका सरकारी शाळेत तासिका तत्त्वावर शिक्षिका म्हणून का करत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदू यांच्या पतीने आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. तिने गळफास घेतला, असं सुभाष यांनी पोलिसांनी कळवलं होतं. पण पोलिसांनी घरी दाखल होण्याआधीच इंदू यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. पोलिसांनी आता हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल कधी येतोय, याची पोलिसांनी प्रतीक्षा आहे.
हे पण वाचा :
धक्कादायक ! व्हिडीओ तयार करुन २२ वर्षीय तरुणाने घेतला गळफास
आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार ठाकरेंची भेट, देऊ शकतात ही ऑफर
खुशखबर… व्हॅट कपातीनंतर राज्यात आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे दर
हत्या की आत्महत्या?
दरम्यान, पोलिसांनी इंदूच्या मृतदेहाशेजारीत पती सुभाषचा एक फोटो सापडला. या फोटोच्या मागच्या बाजुला ‘मै बेवफा नहीं हू’ असं लिहिलेलं होतं. तर इंदूच्या हातावर सुसाईट नोट लिहिलेली होती. मृत इंदूच्या हातावर, मी माझ्या मर्जीने जीव देतेय. मम्मी, पप्पी, दादा, सॉरी. माझा मंगळच माझ्या जीव देण्याचं कारण ठरला, असं तिने लिहिल्याचं आढळंय. पोलिसांकडून आता इंदूच्या हातावरील हस्ताक्षरांचीही तपासणी करत आहेत.