Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. खडसेच गड अभेद्य राखणार रोहिणीताईंचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ – रमेशभाऊ ढोले

najarkaid by najarkaid
October 20, 2019
in जळगाव
0
आ. खडसेच गड अभेद्य राखणार रोहिणीताईंचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ – रमेशभाऊ ढोले
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात भाजपचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे हे पुन्हा एकदा भाजपाचा गड अभेद्य राखण्यास यशस्वी होतील, या मतदार संघातून महायुती च्या उमेदवार सौ. रोहिणीताई खडसे -खेवलकर यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेशभाऊ ढोले यांनी केला आहे.

श्री ढोले हे मराठा समाजाचे असून गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाची धुरा अत्यंत यशस्वीरित्या सांभाळत आहेत. याशिवाय मतदार संघातील मराठा समाजाचे सर्वश्री रामदासभाऊ पाटील, भागवतभाऊ टिकारे, कैलासभाऊ चौधरी, शिवाजीराव पाटील, सुनील भाऊ पाटील, गणेशभाऊ पाटील, विलास भाऊ धायडे,निवृत्तीभाऊ पाटील, भागवतभाऊ पाटील, रामभाऊ पाटील, निलेशभाऊ पाटील असे कितीतरी मात्तबर कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाचा गाडा चालवत आहे.पक्ष संघटनेत मराठा समाजा सोबतच प्रत्येक समाज जसे की गुजर ,लेवा पाटील, कोळी, बौद्ध, माळी, तडवी, अशा सर्वांना स्थान देण्याचा प्रयत्न नाथाभाऊनी सातत्याने केला आहे. गेल्या तीस वर्षांपासून मुक्ताईनगर मतदार संघावर भाजपाचे आ. एकनाथराव खडसे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील बहुतांश सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य भाजपाचेच आहेत, शिवाय मुक्ताईनगर, सावदा, बोदवड या तिन्ही नगरपंचायती, 90%ग्रामपंचायती, कृ.उ.बा. समिती, वि.का. सोसायट्या भाजपाकडेच असल्याचे श्री ढोले यांनी स्पष्ट केले.
सद्य स्थितीत नंदूभाऊ महाजन हे जि प. चे उपाध्यक्ष जि.प.सदस्य जयपाल बोदडे आहेत, रमेश भाऊ पाटील यांनीही बरीच वर्षे कृ.उ.बा समिती बोदवड ची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. नुकतीच भाजपाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अशोकभाऊ यांचेकडे सोपवली आहे. तर मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही नगरपंचायतवर अनुक्रमे सौ नजमाताई तडवी व सईद बागवान मुमताज या दोन्ही अल्पसंख्याक समाजाच्या महिलांना भाऊंनी संधी दिली आहे.मुक्ताईनगरचे शकील सर हे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. तर सावदा नगराध्यक्षा पद सौ अनिता येवले भुषवत आहे. एकंदरीत सर्वसमावेशक जातींना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणून नाथाभाऊ उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. म्हणूनच राज्यात गेल्या तीस वर्षांपासून मतदारांचे भरभरून प्रेम मिळणारा एकमेव नेता फक्त्त मी आहे, असा बऱ्याच जाहीर सभामधून उल्लेख करून नाथाभाऊ नेहमीच मतदाराप्रती आदर व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त करतात.
मतदारांचे प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची फौज या ताकदीवर नाथाभाऊच या निवडणूकीत बाजी मारतील, यात तिळमात्र शंका नसल्याचे सांगून ही निवडणूक केवळ नाथाभाऊसाठीच नव्हे तर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी असल्याने सारे कार्यकर्ते जोमाने, ताकदीने कामाला लागले आहेत. एक अन एक मत काढण्याची, मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी प्रत्येक बूथ प्रमुखाने घेतली आहे. “मेरा बूथ सबसे मजबूत ” या ब्रीद प्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे.त्याचा बूथ मजबूत असल्याचे मतपेटीतुन तो दाखवून देणार आहे. म्हणूनच या निवडणूकित सौ. रोहिणीताईच विजयी होतील….गुलाल तर भाजपा च उधळणार असा विश्वास श्री ढोले यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवजीवन’तर्फे दिवाळीचा गोडवा वाढविणार्‍या खास ऑफर्स !

Next Post

पाचोरा परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. किशोरआप्पा पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us