नवी दिल्ली : देशात महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येतेय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. देशाची राजधानी दिल्लीत एका ५९ वर्षीय आरोपीने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसात जाऊन या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. दोन्ही मुलींचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय अहवालात बलात्काराची पुष्टी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉलच्या माध्यमातून मॉडेल टाऊनमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची बातमी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन्ही अल्पवयीन मुली त्यांच्या आईसह तेथे उपस्थित होत्या. पोलिसांनी पीडित मुली आणि त्यांच्या आईची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून ५९ वर्षीय कालीचरणला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा :
मोठी बातमी ! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाहीच ; सर्वोच्च न्यायालय
शिवसेनेचं ठरलं : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ‘या’ उमेदवाराला पाठिंबा देणार
मनसैनिकांना राज ठाकरेंचा नवा आदेश, ट्विट करून दिले ‘हे’ आदेश
सावधान ! राज्यातील या ५ जिल्ह्यांसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी
सीआयसीच्या समुपदेशक दीपाली यांनी दोन्ही मुलींचे समुपदेशन केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले आहेत. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही मुलींचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही मुलींचे कुटुंबीय रोजची कामे करतात.
मुलींचे आई-वडील घरी नसताना कालीचरणने अनेकदा मुलींची छेड काढल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने बलात्काराची घटना घडवून आणली. या दोन्ही मुलींनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असता त्यांच्या संवेदना उडाल्या. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
















