पाचोरा, (किशोर रायसाकडा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पाचोरा भडगाव चे आमदार किशोरअप्पा पाटील यांची शिंदे सरकार मध्ये राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघात कार्यसम्राट आमदार म्हणून किशोरअप्पा परिचित आहेत, मतदार संघातील समर्थकांनी सुद्धा किशोरअप्पा यांना मंत्रिपद मिळावं म्हणून नेतृत्वाला साकडं घातल्याचे समजते.
किशोरअप्पा पाटील यांची आमदारकीची दुसरी टर्म
आमदार किशोरअप्पा पाटील पाचोरा – भडगाव या विधानसभा मतदार संघांचं दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून मतदारसंघात विकास निधी खेचुन आणत पाचोरा सह भडगाव तालुक्यातील सर्वाधिक विकासाचा पॅटर्न आमदार किशोर पाटील यांच्या मागणीने झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून किशोरअप्पा यांना समजले जाते. किशोरअप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास पाचोरा – भडगाव मतदार संघात विकासाचा नवा आलेख ते उभारू शकता, विविध विकास कामे मार्गी लावून आपला मतदार संघ सुजलाम सुफलाम करू शकता असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.
गेल्या आठवड्यात नव्याने शिंदे सरकार स्थापन झाले असून आज शिंदे सरकारने बहुमत देखील सिद्ध केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात पहिल्या दिवसापासून किशोरअप्पा सोबत असल्याने किशोर पाटील हे शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात असले तरि जळगाव जिल्ह्यातील चार आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत, यापैकी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तर कॅबिनेट मंत्रिपद व जळगाव पालकमंत्री पद देखील मिळणार असल्याचे समजते तर शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री पद किशोरअप्पा पाटील यांना मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळाल्यास जळगाव जिल्ह्याला शिवसेनेच्या कोट्यातून दोन मंत्रीपद मिळतील असं बोलल्या जात आहे.