मुंबई : शिंदे गटात सामील असलेले संजय राठोड यांच्यावर आता चक्क शिवसैनिकांनीच गंभीर आरोप संजय राठोड यांच्यावर केलाय. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रिपद राठोड यांना गमवावं लागलं होतं. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सीडीच्या माध्यतातून समोर आणू, अशी धमकी शिवसैनिकांनी संजय राठोड यांना दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजलीय.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला असून ते शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत गुवाहाटीत आहेत. त्यांच्यासोबत संजय राठोड हे देखील बंडखोर करत आहेत. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी संजय राठोडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय. संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांच्यावर संपात व्यक्त केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातले पुरावे समोर आणण्यासोबत या प्रकरणातील एक सनसनाटी 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे आहे, ती बाहेर काहेर काढू आणि संजय राठोड यांनी बंजारा समाजाची मुलगी कशी मारली हे त्यातून उघड करु असं इशारा देण्यात आलाय. शिवेसनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी हा इशारा दिलाय.
हे देखील वाचा :
गुलाबराव पाटलांसह या मंत्र्यांची खाती काढली ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
राजकीय घडामोडींना वेग ; एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन
सरकारी दुकानातून रेशन घेण्याच्या नियमात मोठे बदल होण्याची शक्यता! जाणून घ्या नवीन तरतुदी
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे संजय राठोड यांनी मंत्रिपद गमावलं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कॅबिनेटमध्ये घेतलं जाऊ शकतं, अशी चर्चाही सुरु होती. मात्र राज्यसभेनंतर विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या मतदारसंघातील शिवसैनितांनी संताप व्यक्त केलाय.