मुंबई | शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मोबाईल वरुन संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून चर्चा केली. शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय परिस्थितीबद्दल बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी पुष्टी मनसेच्या एका नेत्याने केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये प्रवेश करू शकेल.
हे देखील वाचा :
सरकारी दुकानातून रेशन घेण्याच्या नियमात मोठे बदल होण्याची शक्यता! जाणून घ्या नवीन तरतुदी
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका
कोकणासह उत्तर महाराष्ट्रावर राहणार कृपादृष्टी ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडले होते. तसेच भाजपशी राज ठाकरेंची जवळीक सुद्धा वाढलेली पाहायला मिळाले. याच सर्व पार्श्वभूमीवर आता बंडखोर शिंदे गट हे मनसे मध्ये विलीनीकरण करू शकतात. त्यामुळे आगामी काळात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळेल.