भुसावळ | कोरोनाच्या काळात बंद झालेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 10 जुलैपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. यामुळे भुसावळ विभाग आणि जिल्ह्यातील प्रवासी, चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून ही गाडी बंद होती. यानंतर बहुतांश गाड्या पूर्ववत सुरू झाल्या तरी अद्यापही ही गाडी सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. ही गाडी नाशिक, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळामार्गे पुण्याला जाते. यामुळे भुसावळ विभाग आणि जिल्ह्यातील प्रवासी, चाकरमान्यांना कल्याण, पनवेलला जाण्यासाठी ही गाडी सोईस्कर होती.
हे पण वाचा :
अबब.. ड्रग इन्स्पेक्टरच्या घरातून करोडो रुपयांचे घबाड, पैसे मोजण्यासाठी बोलावली लागली मशीन
12वी ते MBBS साठी खुशखबर.. आरोग्य विभागात निघाली मोठी पदभरती
आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..
मात्र सव्वादोन वर्षापासून ही गाडी बंद असलयाने प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता ११०२५ अप आणि ११०२६ डाऊन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १० जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. १० जुलैपासून दररोज हुतात्मा एक्स्प्रेस रात्री १२.३५ वाजता म्हणजेच पूर्वीच्याच वेळेनुसार ही गाडी पुण्याकडे निघेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळा आणि पुणे असा या ट्रेनचा प्रवास असेल.