मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचा एक मोठा गट त्यांच्या सोबत आहेत तर काही आमदार आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचं सांगत सोबत असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दरम्यान कन्नड-सोयगांव मतदारसंघातील आमदार उदयसिहं राजपूत यांचा कार्यकर्त्याशी बोलतांनाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्या आमदार उदयसिहं राजपूत आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करणार नसल्याचे स्पष्ट सांगितलं आहे तर आपण ५० कोटीची ऑफर धुडकाऊन ‘वर्षा’ बंगल्यावर असल्याचं सांगत आहेत.
दरम्यान माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की,जनतेने, स्थानिक नेत्यांनी माझ्यावर प्रेम, विश्वास दाखवला, त्याला कदापी तडा जाऊ देणार नाही. एकवेळ मरण पत्करेन, पण शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही, अशा प्रांजळ भावना आमदार उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केल्या.
शिवसेनेमुळे मी आमदार…
राजपूत म्हणाले, विधानसभा निवडणूक लढलो,पण नशिबाने नेहमीच मला हुलकावणी दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी माझ्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. शिवसेनेने मला विधानसभेत जाण्याची संधी दिली.
हे पण वाचा :
एका आठवड्यात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव
एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले ; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सरकारवर केला हा मोठा आरोप
शिंदे गटाला बसणार धक्का! ‘त्या’ 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस
बंडखोरांचे आरोप ही फेटाळले
वर्षावर जाण्यासाठी मला कधीही अडचणी आल्या नाहीत, मी किमान पंधरा वेळा वर्षावर गेलो आहे. प्रत्येक वेळी आम्हाला केवळ एका फोनवर मुख्यमंत्री भेटत होते त्यामुळे ताटकळत ठेवण्याचा प्रश्नच नसल्याचे कन्नड चे आमदार उदयसिंह राजपूत यांनी सांगितले.