मुंबई : राज्यसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही पक्षांनी आपले आमदार पुन्हा हॉटेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टोला लगावला आहे. हॉटेल बदलून निवडणुका जिंकता येत नसतात. तुम्ही काहीही करा या निवडणुकीत विजय हा आमचाच होणार, असे शेलार ठणकावून सांगत आहेत.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत हरवण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा गोप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला होता. त्यावरून भाजप नेते आशिष शेल रायंनी जलील यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हे पण वाचा :
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा
अखेर प्रतीक्षा संपली : उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल, कसा चेक कराल?
आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि.. ; भाजप नेत्याने नेमक्या काय दिल्या शुभेच्छा
म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं.. सुसाईट नोट लिहून विवाहित तरुणाची आत्महत्या
या निवडणुकीबाबात बोलताना शेलार म्हणाले, हॅाटेल बदलून विजय होत नसतो, त्यांनी आमदार कोणत्याही हॅाटेलमध्ये ठेवले, तरी विधान परिषदेत विजय आमचाच होणार आहेत. तसेच खडसे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, कोणाला एका व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही, आम्ही सेवक म्हणून निवडून येऊन काम करण्यासाठी निवडणूका लढवतो. MIM ही शिवसेनेची बी टीम आहे. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेने डबल स्टारवाली मते आपल्या खांद्यावर लावली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.