मुंबई : राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट दिसून आली होती. परंतु मान्सून पूर्व पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली आहे. मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही 45 अंशापर्यंत उष्ण लाट होती. आज (ता.05) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यापासून नागालॅण्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम सक्रिय आहे. पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बिहार ते आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. आज (ता. 5) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. हे पण वाचा : सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर थेट परिणाम होईल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता, पण..; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा भर रस्त्यात आडवा करत तरुणाचे तुकडे-तुकडे ; घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा Video समोर भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला राज्यात मागच्या 24 तापमान मागच्या 24 तासांत राज्यात पुणे 36.9, नगर 41.4, धुळे 45.9, जळगाव 41.7, कोल्हापूर 32.6, महाबळेश्वर 29.4, मालेगाव 42.2, नाशिक 36.1, निफाड 37.2, सांगली 33.9, सातारा 37.5, सोलापूर 38.5, सांताक्रूझ 34.1, डहाणू 34.2, रत्नागिरी 33.7, औरंगाबाद 41.1, नांदेड 41, अकोला 43.5, अमरावती 44.4, बुलडाणा 39.2, ब्रह्मपुरी 46.1, चंद्रपूर 46.4, गोंदिया 45.4, नागपूर 46.2, वाशीम 41.5, वर्धा 45.2, यवतमाळ 43.2 तापमानाची नोंद झाली.