पाचोरा : भरधाव वेगाने जाणार्या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणार्या जेसीबीचा कट लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी ११.४५ वाजता परधाडे ता. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडलीय. या घटनेचा थरार प्रवाशी आणि कामगारांनी अनुभवला. काही सेकंदाच्या या घटनमुळे या सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता.
याबाबत असे की, कामाख्याहून मुंबईला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. १२५२० अप) ही जळगाव स्थानकावरुन शनिवारी सकाळी रवाना झाली. पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक तिसर्या रेल्वे मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने सिमेंटचे ब्लॉक ठेवण्याचे काम सुरू होते. याचवेळी भरधाव वेगातील एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या भागावर जेसीबीचा पुढील भाग धडकला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भरधाव एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.
हे पण वाचा :
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?
चांदी तब्बल १ हजार रुपयांनी स्वस्त, सोनेही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव
Breaking ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार
प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत ; या सरकारचा मोठा निर्णय
लोकोपायटलने गाडीवर नियंत्रण मिळवत ती काही अंतरावर थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र मोठा अनर्थ टळला. तासाभराच्या प्रयत्नानंतर जेसीबी बाजूला करण्यात आले. यानंतर दुपारी कामाख्या एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्र.१ वर थांबविण्यात आली. भुसावळ येथून दुसरे इंजिन मागवून ते कामाख्या एक्सप्रेसला जोडण्यात आले नंतर ही गाडी दुपारी १२.५० मुंबईच्या दिशेने रवाना झाली. लोको पायलटच्या सर्तकतेने रेल्वेचा मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वे गाडीतील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.