जळगाव – जळगाव शहर मतदार संघातून राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी कडून निवडणूक लढवीत असलेले अभिषेक शांताराम पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज दि. 14, सोमवार रोजी प्रचार दौरा पुढील प्रमाणे असणार आहे.
सकाळी 8 ते 12 -प्रभाग क्रमांक 10 मधील भवानी मंदिर परिसर, प्रिंप्राळा, मयूर कॉलनी, भाऊराव नगर, जिल्हा परिषद कॉलनी, खंडेराव नगर सकाळचा दौरा असा असेल.
संध्याकाळी 5 ते 8 – योगेश्वर नगर, खेडी गाव रोड, पीपल्स बँक कॉलनी, तळदे कॉलनी, ज्ञानदेव नगर, गोपाळ पुरा, गीताई नगर, तुळसाई नगर, विठोबा नगर, सदोबा नगर असा आजचा प्रचार दौरा राहणार आहे.
मतदारांशी साधणार संवाद
प्रचार दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी, काँग्रेस, महाआघाडीच्या उमेदवार मतदारांशी संवाद साधणार असून जळगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला साथ देण्यासाठी आवाहन करणार आहेत.
उच्चशिक्षित उमेदवार असल्याने आघाडीत जोश
जळगाव शहराची विधानसभेची जागा राष्ट्रवादी ने आपल्या कडे ठेवत या ठिकाणी शरद पवार यांनी उच्चशिक्षित, युवा उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीसह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून. मतदार संघात परिवर्तनाचा विश्वास जागवीत आहे.