मुंबई : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. राज्यातील पोलीस दलातील रिक्त 7 हजार पदांसाठी 15 जूनपासून प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागातून ही माहिती मिळत आहे.
राज्यभरात लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे. पोलीस दलातील रिक्त जागांसाठी 15 जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विविध पदांसाठी 7 हजार जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
हे पण वाचा :
NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी, असा करा अर्ज
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर रिक्त जागा ; 12वी पाससाठीउत्तम संधी
नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनामध्ये 302 पदांची भरती, 56,900 इतका पगार मिळेल
तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी.. BSF मध्ये 281 जागांसाठी भरती
अधिकृत तारखेची माहिती जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलीस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. त्यातच आता गृहविभागाने आतापर्यंत साडे पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 7 हजार भरतीची प्रक्रियेला 15 जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.