अकोला : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये नराधम पती आपल्या पत्नीला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या नराधम व्यक्तीची मुलगी आईला मारू नको ना बाबा अशी आर्त विनवणी करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये नराधम पती त्याच्या पत्नीला मुलीदेखतच बेदम मारहाण (beating of wife by husband)करतो आहे आणि त्याला त्याची चिमुकली मुलगी ”आईला मारू नको ना बाबा….!” अशी विनवणी करीत आहे. या व्हिडिओमधील मुलीची आर्त विनवणी ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा येत आहे. हि घटना अकोला जिल्ह्यामधील कृषीनगर भागातील पंचशील नगरातील आहे. या नराधम पतीचे नाव मनिष कांबळे असे आहे. तो पत्नी संगिताला मारहाण करीत असून तिचे तोंड दाबत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
'आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमकुलीचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/oWUjNS2LrR
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 27, 2022
अनेक वर्षांपासून वाद
मनीष कांबळे व त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. मनिषने संगिताला अंधारात ठेवत दुसरे लग्न केल्याचेही समजत आहे. मात्र त्याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या तीन दिवसांपूर्वी दुपारी मनिषने संगिताला अमानुषपणे मारहाण (beating of wife by husband) करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संगीताची मुलगी ”आईला मारू नको ना बाबा….!,” अशा प्रकारची विनवणी करीत असताना व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये तिचा चेहरा दिसत नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात आरोपी मनिष कांबळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.