जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । जळगाव शहर तरुणाच्या हत्येने पुन्हा हादरले आहे. दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ समोर आलीय. अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
अनिकेत गणेश गायकवाड याला आधी दारू पाजली त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याच्या समोर रात्री उशीरा ही घटना घडलीय.
हे पण वाचा :
कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे महागात पडलं! जळगावात रेल्वेच्या धक्क्याने तरूणीचा जागीच मृत्यू
अरे बापरे..हल्लेखोराच्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 23 ठार
कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा
खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू
तसेच खूनी हे मयत तरूणाच्या परिचयातील असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. याबाबत शहर पोलीस स्थानकात अज्ञात मारेकर्यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.