नवी दिल्ली : जर आपल्याला जूनमध्ये बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्वाचे काम करायचे असेल तर ते करण्याआधी एकदा बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा. कारण जूनमध्ये बँकांना एकूण 12 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये सणांनिमित्त 6 सुट्ट्या, 4 दिवस रविवार असल्याने सुट्ट्या तर उर्वरित दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने सुट्ट्या मिळणार आहेत.
आपल्याकडे बँकांच्या सुट्ट्यांविषयीची (Bank Holidays ) संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. यामागील कारण असे की बँका बंद असल्याने बँकिंगशी संबंधित कामांवर (चेकबुक, पासबुक, एटीएम, खात्याच्या व्यवहार) याचा परिणाम होणार आहे. मात्र हे लक्षात घ्या कि, या काळात पेटीएम, फोन पे, गुगल पे, इंटरनेट बँकिंग (ऑनलाइन ट्रान्सफर) सारख्या ऑनलाइन सेवा सुरूच राहतील.
चला तर मग जूनमध्ये बँका किती दिवस बंद राहणार आहेत ते जाणून घेऊयात…
1- जून 2 (गुरुवार): महाराणा प्रताप जयंती/तेलंगणा स्थापना दिवस – हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा
2- 3 जून (शुक्रवार): श्री गुरु अर्जुन देव जी – पंजाब यांचा हुतात्मा दिवस
3- 5 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
4- 11 जून (शनिवार): दुसरा शनिवार बँक सुट्टी
5- 12 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
६- १४ जून (मंगळवार): प्रथम राजा/संत गुरू कबीर जयंती – ओरिसा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब
हे पण वाचा :
मान्सूनचा भारतात आगमनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण वाचा..
कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा
खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे
7- 15 जून (बुधवार): राजा संक्रांती/YMA दिवस/गुरु हरगोविंद यांचा जन्मदिवस – ओरिसा, मिझोरम, जम्मू आणि काश्मीर
8- 19 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
९- २२ जून (बुधवार): खारची पूजा – त्रिपुरा
10- 25 जून (शनिवार): चौथा शनिवार बँक सुट्टी
11- 26 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
12-30 जून (बुधवार): रामना नी – मिझोरम.
RBI कडून दर महिन्याला सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holidays ) जारी केली जाते. मात्र हे लक्षात ठेवा कि, वर नमूद केलेल्या सर्व सुट्ट्या या प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या असणार आहेत.