मुंबई : मुंबईतून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईत प्रियकर आणि प्रेयसी संभोग करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुर्ला परिसरात घडली. विशेष म्हणजे मृताचे वय हे 61 तर त्याच्या प्रेयसीचे वय हे 40 आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा ते करत आहेत. मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा वार आढळून आलेले नाहीत.
मुंबईतील कुर्ला येथे एलबीएस रस्त्यावर जीएसके नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी एकाने आपल्या प्रेयसीसोबत सोमवारी सकाळच्या सुमारास चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी लैंगिक संबंध ठेवले. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लैंगिक संबंधादरम्यान, या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं आणि संभोगाच्या अवस्थेतच तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याची प्रेयसी ही अत्यंत घाबरुन गेली.
हे पण वाचा :
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपेंचे महत्वाचे विधान.. म्हणाले
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल
सोन्या-चांदी पुन्हा वधारली ; खरेदीला जाण्यापूर्वी चेक करा नवीन दर
तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं. यानंतर या पुरुषाला सायन रुग्णालयात आणलं गेलं. मात्र, इथं आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.