Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी औक्षण, फटाके फोडून स्वागत

najarkaid live by najarkaid live
October 12, 2019
in जळगाव
0
महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी औक्षण, फटाके फोडून स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांचा प्रचार दौरा गुरुवारी शहरात पार पडला. सकाळी वाल्मिक नगरात आ.भोळे यांनी महर्षी वाल्मीक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आशिर्वाद घेतल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली.

ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाके फोडून भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला. प्रसंगी नगरसेवक जितेंद्र मराठे, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, प्रविण कोल्हे, भारत कोळी, किशोर बाविस्कर, पार्वताबाई भील, महेश चौधरी, विष्णू भंगाळे, चेतन सनकत, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, रिपाइंचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, गीताबाई वाघ, शिवसेनेच्या मंगला बारी, ज्योती शिवदे, आबा बाविस्कर, नवनाथ दरकुंडे, शरिफा तडवी यांच्यासह मंडळ अध्यक्ष कपील पाटील, परेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष बापू ठाकरे, युवा मोर्चाचे आनंद सपकाळे, नितीन तायडे, मुकेश कुलकर्णी, जयश्री पाटील, महेश पाटील, यांच्यासह भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

महर्षी वाल्मिक मंदिर येथून प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर गोपाळपुरा, झोपडपट्टी परिसर, पक्की चाळ, दिनकर नगर, असोदा रोड, मोहन टॉकीज परिसरमार्गे तानाजी मालुसरे नगरात प्रचार रॅली समाप्त झाली.

दुपारी 5 वाजता जिल्हा परिषदेसमोरील पत्र्या हनुमान मंदिरात प्रचार नारळ वाढून प्रचाराला सुरूवात झाली.

त्यानंतर श्री गोगादेवजी महाराज व श्री रामदेवजी महाराज मंदिरात आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी दर्शन घेतल्यानंतर रॅली बळीरामपेठेच्या दिशेने मार्गस्थ झाली. याप्रसंगी भाजपा उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक मुकूंदा सोनवणे यांच्यासह भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय (-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

जिल्हापरिषद, तहसील कार्यालय, बळीराम पेठ, शनिपेठ पोलीस ठाणे, गुरूनानक नगर, मायका देवी मंदिर, गवळी वाडा, रिधुर वाडा, शनिपेठ, भिलपुरा, बालाजी पेठ, सराफ बाजार, बोहरी गल्ली, भगवान नगर, जोशी पेठ, विठ्ठलपेठमार्गे राममंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला.

महिलांनी केले औक्षण, फुलांचा वर्षाव

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांची प्रचार रॅली प्रत्येक परिसरातून मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात येवून विजयाचा आर्शिवाद देण्यात येत होता. आ.भोळे यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात येवून फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात येत होते.

दर्ग्यावर चढविली चादर

भिलपुरा चौकात पोहचल्यानंतर त्याठिकाणी अयाज अली यांच्यासह मुस्लीम बांधवांकडून आ.राजुमामा भोळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रसंगी दर्ग्यावर चादर चढवून आ.भोळे यांनी विजयासाठी प्रार्थना केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगावातील सभास्थळी कडेकोट बंदोबस्त 

Next Post

जळगाव शहर परिसरात अभिषेक पाटील यांचा झंझावाती प्रचार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव शहर परिसरात अभिषेक पाटील यांचा झंझावाती प्रचार

जळगाव शहर परिसरात अभिषेक पाटील यांचा झंझावाती प्रचार

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us