चाळीसगाव | लग्नाचे आमिष दाखवून १६ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यातून मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात घडलीय. याबाबत संशयित नराधम भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळविले. संशयिताने तब्बल साडे सहा महिने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या प्रकारातून ती मुलगी गर्भवती झाल्याचा गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बु. (मजरे) येथील रहिवासी असलेला भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
हे पण वाचा :
भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर
घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण
सुवर्णसंधी.. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे 105 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
जामनेर तालुक्यातील तरुणाचा नकली नोटा छापण्याचा पराक्रम; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले
बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
दरम्यान, पिडीतेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम- ३७६ (२) (एन), ३६३, ३६६ (ए), पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.