Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर मतदार संघात उमेदवारांचा ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च

najarkaid by najarkaid
October 12, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : विधानसभा निवडणूक लढविणारे व माघार घेतलेल्या उमेदवारांनी ११ रोजी निवडणूक खर्च सादर केला. यामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १३ उमेदवारांचा ९ आॅक्टोबरपर्यंत ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च झाला असून माघार घेतलेल्या ८ उमेदवारांचा माघारीपर्यंत एक लाख ४ हजार २२ रुपये खर्च झाला आहे. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांनी खर्च सादर केल्याने या वेळी कोणालाही नोटीस काढण्याची वेळ आली नाही.
जळगाव शहर मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या तसेच माघार घेतलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याविषयी जळगाव शहर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी ९ रोजी पत्र काढून ते उमेदवारांना ई-मेल तसेच मोबाईलवर पाठविले होते. त्यात निवडणूक खर्च हिशोब नोंदवही तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ११ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मनपा इमारतीमध्ये असलेल्या हिशोब शाखेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ११ रोजी उमेदवारांचा खर्च सादर होण्यास सुरुवात झाली.
यामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा ९ आॅक्टोबरपर्यंत ३ लाख २८ हजार ५३९ रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा ५९ हजार १८३ रुपये, वंचित बहुजन आघाडीचे शफी अ.नबी शेख ३० हजार ९४५ रुपये, मनसेचे जमील देशपांडे यांचा २५ हजार ५६० रुपये, अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा २७ हजार ४५ रुपये, आशीष जाधव यांचा २० हजार ७६० रुपये, बहुजन समाज पक्षाचे अशोक शिंपी यांचा १० हजार ८७३ रुपये, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वंदना पाटील यांचा १० हजार ७०३ रुपये, अपक्ष ललित शर्मा यांचा १० हजार ४०० रुपये, गोकूळ चव्हाण यांचा ६ हजार ८५० रुपये, अनिल वाघ यांचा ५ हजार ७५० रुपये, माया अहिरे यांचा ५ हजार ३७० रुपये, बहुजन मुक्ती पक्षाचे गौरव सुरवाडे ५ हजार ३२० रुपये असा एकूण १३ उमेदवारांचा ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक खर्च हिशोब शाखेतून मिळाली.
माघार घेतलेल्या उमेदवारांचा एक लाख ४ हजार २२ रुपये खर्च
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून माघार घेतलेल्या आठ उमेदवारांनीही ११ रोजी खर्च सादर केला. यामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या व माघार घेतलेल्या सीमा भोळे यांचा २२ हजार ५३९ रुपये खर्च झाला आहे. तसेच अपक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचा १४ हजार ८८९ रुपये, डॉ. शांताराम सोनवणे यांचा १४ हजार ६३० रुपये, अ‍ॅड. गोविंद तिवारी यांचा १० हजार ५०० रुपये, अरुण बोरोले यांचा १० हजार ४७४ रुपये, नारायण अग्रवाल यांचा १० हजार ४०० रुपये, चंद्रकांत बेंडाळे यांचा १० हजार ३४० रुपये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शैलेंद्र पाटील यांचा १० हजार २५० रुपये असा एकूण १ लाख ४० हजार २२ रुपये खर्च झाल्याचे सादर करण्यात आले आहे.

दुसरी तपासणी १५ रोजी
उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवहीची दुसरी तपासणी आता १५ रोजी होणार असून त्यानंतर १८ आॅक्टोबर रोजी तिसरी तपासणी करण्यात येणार आहे.

एकालाही नोटीस नाही
लोकसभा निवडणुकीवेळी वेळेवर खर्च सादर केला जात नसल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनाही नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच खर्च तपासणीला सर्व उमेदवारांचा खर्च सादर करण्यात आल्याने एकाही उमेदवाराला नोटीस देण्याची वेळ आली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी !

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगावातील सभास्थळी कडेकोट बंदोबस्त 

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगावातील सभास्थळी कडेकोट बंदोबस्त 

ताज्या बातम्या

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us