Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझी कन्या भाग्यश्री योजना ; पात्र लाभार्थ्यांना सरकार देतंय ५० हजार

najarkaid by najarkaid
May 21, 2022
in राज्य
0
महिलांसाठी शासनाच्या ‘या’ आहेत योजना
ADVERTISEMENT

Spread the love

आज आपण “माझी कन्या भाग्यश्री योजना” संदर्भात जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने सदर योजना २०१६ साली सुरु केली असून या योजनेचा प्रमुख हेतू हा गरिबाच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे व मुलगी मोठी झाल्यावर तिचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा होता.या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना एक मुलगी आहे त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मिळतात. तर ज्या शेतकऱ्यांना दोन मुले आहेत त्यांना एका मुली पाठीमागे २५ याप्रमाणे दोन मुलीचे ५० हजार रुपये मिळतात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे…

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे व दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे.

कुटुंब नियोजनानंतर सरकारकडून एका मुलीच्या नावे 50,000 रुपये किंवा दुसर्‍या मुलीच्या जन्मानंतर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा होणार आहेत. मात्र, या योजनेत आता काही अंशी बदल करण्यात आलेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात ‘सुकन्या’ योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेचा उद्देश
‘सुकन्या’ योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत करण्यात आल्यामुळे ‘सुकन्या’ योजनेच्या सर्व अटी व शर्ती ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेमध्ये लागू करण्यात आले.

योजनेच्या प्रमुख अटी
मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक.
कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी 1 वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक.
कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक.
एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
सदर योजनेचा लाभ ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.

जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी 6 वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी 12 वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे-मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. (मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)
या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.
दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, उत्पन्नाचा दाखल, रहिवासी दाखल, मुलीचा जन्मदाखला पासपोर्ट साइज फोटो.

अर्ज करण्याची पध्दत

सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

योजनेची अधिक माहिती ‘येथे’ उपलब्ध
या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

महत्वाचे : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवकांनो तयारीला लागा ; राज्यात ९० हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा… जाणून घ्या कुठे किती जागा…

Next Post

धक्कादायक ; एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

धक्कादायक ; एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us