ज्या मान्सूनची वाट शेतकरी दरवर्षी पाहत असतो तो मान्सून आज 16 मे रोजी अंदमानच्या समुद्रात दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळमध्ये 27 मेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान तयार होत असल्याचे आनंदायी वृत्त आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भामध्येही ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट….
आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
नैऋत्य मान्सून द.बंगालच्या उपसागराच्या काही भागात,अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग व अंदमान समुद्रात आज 16 मे रोजी पुढे सरकला
पुढील 4-5 दिवसांत केरळ किनारपट्टी व द.आतील कर्नाटक,आसाम,मेघालय व अरुणाचल प्रदेशात isol मुसळधार-अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता IMD कडून वर्तविण्यात आली आहे.
हे देखील वाचा….
गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती ; एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट
‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
#SWMonsoon2022
Good news:
SW Monsoon today 16 May; arrived over Andaman Sea.
अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल ..
अंदमानके समुद्र में आज मान्सून दाखील.
– IMD pic.twitter.com/akWTJvHn5W— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 16, 2022
नैऋत्य मान्सून द.बंगालच्या उपसागराच्या काही भागात,अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग व अंदमान समुद्रात आज 16 मे रोजी पुढे सरकला
पुढील 4-5 दिवसांत केरळ किनारपट्टी व द.आतील कर्नाटक,आसाम,मेघालय व अरुणाचल प्रदेशात isol मुसळधार-अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 16, 2022