मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या जाहीर सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’मास्टर सभा म्हणे.. ही तर नस्तर सभा.. महाराष्ट्र ला लागलेल नस्तर!!’ असं म्हणत राणे यांनी शिवसेनेवर घणाघात केलं आहे.
हे पण वाचा :
शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या ; खडसेंच्या कानपिचक्या
अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा
‘या’ जिल्ह्यात शिक्षण नसेल तरी मिळेल नोकरी; इतका मिळेल पगार, त्वरित करा अर्ज
उर्फी जावेदचा नवीन Video इंटरनेटवर होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
ते पुढे म्हणाले,’शिवसेनेच्या सभेत ना मुख्यमंत्री ना पक्षप्रमुख दिसले. घाबरलेला बिथरलेला आजारी माणूस दिसले. कालच्या भाषणानं मला त्यांची दया येत आहे. मी त्यांच्या डॉक्टरांना विनंती करतो. औषधांचा डोस कमी करावा. आजारी माणसाला इतका त्रास कुटुंब का देतंय? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला आहे.