जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड आज गुरुवारी होत आहे. दरम्यान, ग.स. सोसायटीवर सहकार गटाने सत्ता काबीज केली असून यात अध्यक्षपदी पॅनल प्रमुख उदय पाटील तर उपाध्यक्षपदी लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे यांची आज निवड जाहीर करण्यात आली.
ग. स. सोसायटीची यंदाची निवडणूक ही आरोप प्रत्यारोपांनी गाजली असून यंदा बहुरंगी लढत झाल्यामुळे नेमकी सत्ता कुणाची येणार याबाबत संभ्रमावस्था होती. तर मतदारांनी देखील संमिश्र कौल दिल्यामुळे हा गोंधळ अजूनच वाढला. सहकार गटाने शेवटच्या टप्प्यात चांगलीच मुसंडी मारत नऊ जागा मिळविल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत हुकल्याने त्यांना दुसर्या कुणासोबत तरी हातमिळवणी करणे गरजेचे होते. तर लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना या दोन्ही पॅनलला देखील प्रत्येकी सहा जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढला होता.
हे पण वाचा :
अरे वा! आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, कसे जाणून घ्या?
जगाची डोकेदुखी वाढणार ! ‘झिरो कोविड केस’चा दावा करणाऱ्या देशात पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
अखेर संभाजीराजेंची मोठी घोषणा, निवडणुकीबाबत म्हणाले..
यात प्रगती शिक्षक सेना पॅनलने पहिल्यांदा आपल्याला अध्यक्षपद हवे ही मागणी लाऊन धरली. यात निवडीच्या दोन दिवस आधी लोकसहकारचे दोन सदस्य सहकारच्या गळाला लागल्याची चर्चा होती. आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.