काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत असून सदर व्हिडीओ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाईट क्लबमध्ये (Viral Video) दिसत आहेत. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका होतं आहे तर या व्हिडिओनंतर युजर्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर दुसरीकडे खासगी आयुष्यात इतरांनी दखल देण्याचे कारण काय असा सवालही युजर्सकडून उपस्थित करण्यात येत आहे.
Rahul Gandhi was at a nightclub when Mumbai was under seize. He is at a nightclub at a time when his party is exploding. He is consistent.
Interestingly, soon after the Congress refused to outsource their presidency, hit jobs have begun on their Prime Ministerial candidate… pic.twitter.com/dW9t07YkzC
— Amit Malviya (@amitmalviya) May 3, 2022
प्राप्त माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या एका मैत्रिणीच्या विवाह सोहळ्या निमित्त नेपाळच्या राजधानीत काठमांडूमध्ये असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी नेपाळमध्ये आले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
राहुल गांधी यांची मैत्रिण सुमनिमा उदास ही एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून कार्यरत होती. सुमानिमाच्या वडिलांनी नेपाळचे राजदूत म्हणून म्यानमारमध्ये जबाबदारी पार पाडली. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती या विवाह सोहळ्यात दाखल होणार आहेत.राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपशी संबंधित राजकीय नेते, उजव्या विचारसरणीला पाठिंबा असणाऱ्या युजर्सकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे.