नांदेड : 60 वर्षांच्या नराधमाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून गावकऱ्यांनी या नराधमास चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. नरबा कांबळे असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमुकलीचे आई-वडील शेताकडे गेल्याची संधी साधत गावातीलच नरबा कांबळेने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेले आणि अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीने आईला याबाबत सांगितले, त्यावेळी त्यांना धक्काच बसला.
गावकऱ्यांकडून चोप
यातील साठ वर्षीय नराधम आरोपी नरबा कांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार झाल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव सुरू झाल्याने ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्याने गावकऱ्यांनी आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.
पीडितेवर रुग्णालयात उपचार
पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून सोनखेड पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.