पाचोरा – येथील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव युवासेनेचे सुमित किशोर पाटील यांनी ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. आज त्यांची पाचोरा तालुका येथील वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, शिंदाड येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रॅली झाली. जणतेतुन त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले त्यांच्या या प्रचार दौर्यास उत्सुफूर्त प्रतिसाद भेटत असून हा प्रतिसाद पाहिल्यानंतर गुलाल आम्हीच उधळवू अशी प्रतिक्रिया युवानेते सुमित किशोर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.
या दौर्यात त्यांच्या सोबत युवासेनेचे उपजिल्हायुवाधिकारी अजय जैस्वाल,समाधान पाटील, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील,मोरेश्वर गोहिल, डॉ.शेखर पाटील,भागवत पाटील, शिवाजी परदेशी,सूरज जगताप, गोपाल पाटील, भगवान पांडे, कृष्णा पाटील, विश्वास पांडे, कैलास बापु, दिनकर पाटील, दीपक मोरे, जितू शिंपी, वसंत गवळी, शांताराम शिंदे, सोपान ठोमरे, तेजराव पाटील (डॉन), संजय धुमाळ, पुंडलिक बापूराव पाटील, तसेच गावातील सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते