जळगाव – जळगाव श्हरात न्यु बी जे मार्केट समोर वासुदेव त्रंबक डांगे वय ५२रा. हनुमान नगर, जळगाव यांना पैशाच्या वादातुन चापटाबुक्यांनी मारहाण करुन एका आरोपीने ४ जून रोजी खून केला होता . मात्र आरोपी फरार झाला होता . त्याला आज पोलिसांनी अटक केली . सतिष अण्णा भोपळे असे आरोपीचे नाव आहे.
सदर बाबत जिल्हापेठ पोलीस स्टेश्न येथे जिल्हापेठ पोलीस स्टेश्न भाग-5 गुरन .94/2019 भादवि.क.302,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करणे बाबत सुचना व मार्गदर्श्न पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी , सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांना पोलीस निरीक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेश्न व स्थानिक गुन्हे शाखेस आरोपी अटक करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
वरील सुचनाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ. रविद् गिरासे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील,दिनेश् बडगुजर, बापु पाटील,विजय शामराव पाटील,सचिन महाजन, नरेद्र वारुळे अशांचे पथक तयार केले होते. सदर पथकाने वरील गुन्हयातील संश्ईत आरोपी सतिष आणा भोपळे वय-42 रा.सिध्दी विनायक शाळेमागे, हनुमान नगर,जळगाव हा गुन्हा घडल्या बरोबर घटनास्थळावरुन पळुन गेला . आरोपी सतिष अण्णा भोपळे यांचा तातडीने शोध घेवुन त्यास जिल्हापेठ पोलीस स्टेश्न भाग-5 गुरन .94/2019 भादवि.क.302,34 या गुन्हाकामी ताब्यात घेवुन पुढील तपास कामी जिल्हापेठ पोलीस स्टेश्न चे ताब्यात देण्यात आलेले आहे.














