Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीणमध्ये चौरंगी लढत

najarkaid live by najarkaid live
October 6, 2019
in राजकारण, जळगाव
0
जळगाव ग्रामीणमध्ये चौरंगी लढत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- सध्या जळगाव ग्रामीण मतदार संघात चौरंगी लढत होण्याचे चित्र असून यामुळे या मतदार सांगतात ‘टफ फाईट ‘होणार आहे . त्यामुळे सहकार राज्यमंत्र्यांना पुन्हा निवडून येण्याचे आव्हान समोर राहणार आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आळीपाळीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मतदार संघ राहिला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता . नंतरच्या निवडणुकीत गुलाबराव देवकरांचा गुलाबराव पाटील यांनी पराभव केला होता .

यानंतर गुलाबराव पाटलांना देखील मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यांनी कोट्यवधींची विकासकामे केल्याचा दावा केला असून या विकासकामांच्या बळावर ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांचे कट्टर स्पर्धी गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती . यामुळे गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये कट्टर स्पर्धी यंदा राहणार नाही याची खात्री असल्याने त्यांना विजयाची शाशवती होती . मात्र ४ रोजी ऐनवेळी गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केल्याने आणि गुलाबराव देवकर यांना जामीन मिळाल्याने गुलाबराव पाटील समर्थकांची पायाखालची वाळू सरकली आहे. सध्या गुलाबराव देवकर हे निवडणूक लढवू शकत नसल्याने त्यांच्या चिरंजीवाचा प्रचार ते करू शकणार आहेत . त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या जोरावर ते चिरंजीवांसाठी मतांचा जोगवा मागू शकणार आहे . जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव देवकर यांना मोठ्या प्रमाणत मानणारा गट असल्याने विशाल देवकर हे गुलाबराव पाटलांना चांगलीच लढत देऊ शकणार आहेत . तर दुसरीकडे पुस्पा महाजन यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली असून त्यांचे धरणगाव तालुक्यात प्रस्थ आहे . याशिवाय जळगाव बाजार समितीचे माजी सभापती लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी सभापतीपदाच्या कार्यकाळात जळगाव तालुक्यात भरीव कामे केली असून शेतकरी व्यापारी यांचाही त्यांना मोठा पाठिंबा आहे . लकी टेलर अपक्ष लढत देत असले तरी त्यांनी दोन वर्षांपासून मतदारसंघात वैयक्तिक भेटीगाठी वाढविल्या होत्या . त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे . त्यामुळे विद्यमान आ. गुलाबराव पाटील यांच्यासमोर निवडून येण्याचे मोठे आव्हान असून चौरंगी लढतीचा कुणाला फायदा होऊन कोणता उमेदवार निवडून येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला साथ द्या – अभिषेक पाटील 

Next Post

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us