वाडी, ता. पाचोरा , (संतोष मोरे)- सुरतहुन प्रवाशांना घेऊन निघालेल्या सुरत– जामनेर चालत्या बसमध्ये प्रवासा दरम्यान एका प्रवाशास हृदयवीकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आज दिनांक 28 रोजी घडली असून मृत्यू झालेल्या प्रवाश्याचे रोहिदास श्यामराव पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. ते वाडी शेवाळे येथील मूळ रहिवासी असून शरद शामराव पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्यावर आज सायंकाळी 5:30 वाजता मूळ गावी वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नेमकं काय घडलं…
एका प्रवाशास नवापूर ते विसरवाडी दरम्यान अस्वस्थ वाटू लागले.चालक वाहक व सहप्रवाशांनी राष्ट्रीय महामार्गावर जवळील विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात सदर प्रवासी व्यक्तीला उपचारार्थ दाखल केले. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर व्यक्तीला नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असता दरम्यान विसरवाडीहुन नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जातांना रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली.
सुरत महानगरपालिकेत होते सेवेत
रोहिदास श्यामराव पाटील हे सुरत महानगरपालिका अग्निशमन दलात फायरमन पदावर काम करत असल्याचे ओळखपत्रामुळे माहिती मिळाली आहे. ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नातेवाईकांकडे वर्षश्राद्ध असल्याने जात असताना त्यांना बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. रोहीदास पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाडी येथील रहिवासी.