जळगाव – जळगाव शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार जमील देशपांडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून मतदार संघात बहुरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज जमील देशपांडे यांनी दुपारी 12 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर , किरण वानखेडे, कैलास लोखंडे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. शहरात रस्त्यांच्या अपघातात अनेकांचे मृत्यू झाले असून यासाठी आमची उमेदवारी असल्याचे जमील देशपांडे यांनी सांगितले.