जळगाव – जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सट्टा पेढीवर धाड टाकून दोघांना अटक करून दहा हजार रुपयांची रोकड जप्त केली .
याबाबत माहिती अशी कि , पहूर येथील बस स्ट्यांड्वर आज एलसीबीच्या उमेश गिरी , भारतसिंग गोसावी,आदींनी धाड टाकून आरोपी दीपक पाटील, अकील तडवी या दोघांना अटक केली. पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी ,सुधाकर अंभोरे, संदीप सावळे, उमेश गोसावी, आदींनी धाड टाकून अटक केली . तपास अनिल अहिरे करीत आहे .















