भुसावळ : शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. भुसावळ शहरातील एका ७५ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ट्यूशनला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित नराधम जयंत रायन (वय ७५) याच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
रविवार, ६ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी ट्यूशनला गेली होती. तेव्हा ट्यूशनमध्ये कोणीही नव्हते. ही संधी साधून जयंत रायन (वय ७५, रा. भुसावळ) पीडित मुलीला म्हणाला की, तू मला मिठी मार. पीडित मुलगी आरोपीजवळ गेली असता त्याने तिला जवळ ओढले व बेडवर झोपविले.
घाबरलेली ती मुलगी घरी निघून गेली. घडलेला सगळा प्रकार तिनं आईला सांगितला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जयंत रायन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.