जळगाव। इंस्टाग्रामवरून झालेली मैत्री एका ३३ वर्षीय महिलेच्या अंगाशी आली आहे. इन्ट्राग्रामवर मैत्री झाल्याने फेशीयन करण्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वढेच नाही तर हॉटेलमध्ये केलेले व्हिडीओ दाखवून ५० हजाराची मागणी केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३३ वर्षीय विवाहिता ही आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे इन्ट्राग्रामवर त्यांचे खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय-४८) रा. जळगाव याची ओळख निर्माण झाली. दरम्यान इन्ट्राग्रामवर मैत्री झाल्याने फेशीयन करण्याच्या कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी हा घेवून गेला.
हे देखील वाचा :
नवीन बाईक-कार घेणे महागणार, या तारखेपासून वाढणार ‘रेट’, जाणून घ्या कारण
16 मार्चपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर 12 रुपयांनी वाढणार?
बीएसएफच्या मुख्यालयावर जवानाकडून अंदाधुंद गोळीबार, 5 जवानांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धदरम्यान आली आनंदाची बातमी, खाद्यतेल महागणार नाही!
आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..परीक्षेशिवाय मिळेल नोकरी
विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवणून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनविला. व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी दिली. विवाहिता संशयित आरोपी गणेश चौधरी याला समजविण्याचा प्रयत्न केला आता विवाहितला मारहाण केली व तिच्या पतिकडून फेसबुकवरून पैश्यांची मागणी केली. विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शांताराम पाटील हे करीत आहे.