वावडदा ता.जि.जळगाव – जवळच असलेल्या बिलवाडी ता जळगाव येथे आज दि.4 रोजी दारू बंदी साठी महीला आक्रमक पवित्रा हाती घेतल्या या वेळी गावातील सर्व महिला उपस्थित होते
काही दिवसा पूर्वी वावडदा येथे पुर्ण 100 टक्के दारू बंद करून ठराव करण्यात आला होता
बिलवाडी गावातील सी आर पी महिला बचत गट अध्यक्ष संगिता रोहिदास पाटील सह या महिला नी पुढाकार घेऊन गावातील महिलांना एकञ करून दारू बंदी निवेदन सरपंच सुलभा भरत पाटील. उप सरपंच कविता पाटील .पो पाटील सुवर्णा उमरे. ग्रामसेवक एस एल बागुल यांना देण्यात आले सर्व महिलांनी गावठी दारू विक्री करणाऱ्याना समज देऊन दिले परंतु दारू विक्री करणाऱ्यानी ह्या सर्व महिलांना धमकी दिली तरी हे सर्व महिलांना आक्रमक झाले होते तरी पो पाटील यांनी महिलांना शांत केले या वेळी गावातील समाधान पाटील. विनोद पाटील. भरत पाटील. आबा गोपाळ. . सुमन धनगर गावातील चारशे महिला उपस्थित होते.