जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर रेल्वे बोगद्याजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू झला. ही घटना आज सकाळी घडली असून याबबत रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत असे की, खंडेराव नगर रेल्वे बोगदा दरम्यान रेल्वे रुळावर दादर अमृतसर एक्सप्रेसचा धक्का लागल्याने एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे.
रेल्वेरुळावर अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रामानंदनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल अजित पाटील यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिलेच्या अंगात निळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाची बारीक डिझाईन असलेला आणि पांढऱ्या रंगाची लेगीज पँट आहे. या वर्णनावरून महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.