पुणे : लेझीम, ढोल, गौराईचे खेळ अशे अनेक वाद्य सण उत्सव साजरे करताना वाजवले जातात. नाशिक ढोल सारखे पथक देखील गर्वाचे काम करतात. गणेशोत्सव, लग्न, हळद, होळी अश्या आनंदाच्या क्षणी संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते. नवरी साडी मराठमोळा साज करून मुली मिरवणूक काढतात. दरम्यान, एका लग्नात जोडीने केलेला खान्देश मधील पावरी गाण्यावर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
खान्देश मधील पावरी हे गाणं आणि नृत्य तुम्ही ऐकले पाहिले असेलच. याच व्हिडिओमध्ये मुलगा मुलगी त्यावर डान्स करत आहेत. त्यांच्या स्टेप्स देखील एकदम सेम असल्याने ते खूप भारी वाटत आहे. मुलीने आकर्षक रंगाची साडी, मेकअप असल्याने तिने सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळवल्या आहेत. बाकीच्या पण अनेक मुली, महिलांनी सुंदर मराठमोळा साज केला आहे.
















