राज्यभरातून एक हजार पत्रकारांची उपस्थिती राहणार
जळगाव – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे येत्या 9 जून रोजी जळगाव येथे 14 वे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रमुख मान्यवर,जेष्ठ पत्रकार यांच्यासह राज्यातून एक हजार पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
याबाबत सविस्तर असे कि,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रथमच जळगाव येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे.सदर अधिवेशन कांताई सभागृह,जळगाव येथे रविवार दिनांक 9 जून 2019 रोजा दोन सत्रात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यन्त होणार आहे.यावेळी प्रथम सत्रात उदघाटक म्हणून माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे तर अध्यक्ष म्हणून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत तसेच प्रथम सत्रात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ.राजूमामा भोळे,आ.किशोरआप्पा पाटील,आ.चंदुभाई पटेल उपस्थित राहणार.तर द्वितीय सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री ना गिरीशभाऊ महाजन यांची उपस्थिती राहणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे,सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील,राज्यमंत्री दर्जा डॉ.गुरुमुख जगवाणी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,खा.रक्षाताई खडसे,खा.उन्मेषदादा पाटील,जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने,राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, वृत्त वाहिनी संघाचे रणधीर कांबळे,मनिष केत ,उमेश कुलकर्णी,चिटणीस सुरेखा खानोरे,मुंब ई अध्यक्ष संजय माळवदे,उपनगरे प्रमुख डाँ स्वामी शिरकुल,मंत्रालय संपर्क प्रमुख खंडुराज गायकवाड,नितीन तोरस्कर , प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे ,राकेश टोळ्ये ,सोमनाथ देशकर ,कुंदन जाधव,कुंदन पाटील ,संपर्क प्रमुख किरण बाथम,संतोष साबळे,कोकण विभागीय प्रमुख भगवान चंदे,मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलीक वाळेकर ,नागपुर विभाग प्रमुख महेश पानसे,विर्दभ सचिव निलेश सोमणी ,अमरावती विभाग प्रमुख नितीन राऊत ,प्रदेश कार्यकारणी सदस्य सुबोधकुमार जाधव ,दिपक कांबळे,निळकंठ कराड,डाँ अभयकुमार दांडगे ,बाळासाहेब देशमुख ,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके,यांच्यासह अनेक आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.
प्रथम सत्रात माध्यमांचे बदलते स्वरूप या विषयावर चर्चा सत्रात मिरर नाऊचे संपादक मंदार फणसे,लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी पत्रकार बांधवानी सदर अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले आहे.