मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्यातील पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी करण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी यासंबंधीचे आदेश जारी केले असून, हा निर्णय प्रायोगिक तत्वावर लागू होणार आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक (जीडीपी) संजय पांडे यांच्या वतीने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा :
१ फेब्रुवारीपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित हे नियम बदलणार, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
ई-श्रम कार्ड असलेल्यांच्या खात्यात 1000 रुपये येताय, अशी तपासा तुमच्या खात्याची स्थिती
नंदुरबार स्थानकाजवळ ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार, गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग
धक्कादायक ! सिंध नदीत १२ जण असलेली बोट बुडाली, पहा घटनेचा थरार व्हिडिओ
सर्वसाधारणपणे, पुरूष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तासांची शिफ्ट असते. गुरुवारी पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्युटी ही पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला अधिकाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू करण्यात आला होता.