नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वेग पुन्हा अनियंत्रित झाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 235532 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, मृत्यूची आकडेवारी भयावह आहे. गेल्या २४ तासात 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २० लाख ०४ हजार ३३३ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहे.
दरम्यानं, महाराष्ट्रात शुक्रवारी २४ हजार ९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ७६ लाख ५५ हजार ५५४ झाली आहे. तर, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५८६ आहे. राज्यभरात शुक्रवारी ४५ हजार ६४८ कोविड रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत ७२ लाख ४२ हजार ६४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत; तर, आजच्या १०३ जणांच्या नोंदीसह आतापर्यंतच्या मृतांचा आकडा १ लाख ४२ हजार ४६१ आहे. शुक्रवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४१ लाख ६३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६ लाख ५५ हजार ५५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ६१ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. ३ हजार २०० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हे देखील वाचा :
निरोगी राहण्यासाठी दिवसातून एकदा कॉफी प्या, मिळतात हे आरोग्यादायी फायदे
सोने 900 रुपयांनी तर चांदी 2200 रुपयांनी गडगडली, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील भाव
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
Flipkart वर 50 इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा
अनुनासिक लस चाचणी मंजूर
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकच्या नाकातील लसीच्या चाचणीला सरकारने मान्यता दिली आहे. नाकातील लस ही नाकातून दिली जाणारी लस आहे. ही चाचणी देशभरात घेतली जाणार आहे. चाचणीत ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाले, तर ती बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल.