यावल । तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय मुलावर एकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान घडली असून संशयित आरोपी याने शेतात हरभरा खाण्याचा बहाणा करून शेतात नेले. त्या ठिकाणी निर्जळ ठिकाणी नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.
हे सुद्धा वाचा :
.. तर ‘या’ एका चुकीमुळे रेल्वेत नोकरी मिळण्यावर आजीवन बंदी लागू शकते
‘या’ योजनेत तुम्हाला मासिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल, जाणून घ्या कसे?
SBI, PNB, BOB च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 1 फेब्रुवारीपासून हे नियम बदलणार
झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?
मुलावर अत्याचार करून संशयित आरोपीने कुणाला सांगू नको असा दम दिला. याप्रकरणी मुलाच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मोहन लोखंडे करीत आहे.