राजगढ : मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक नात्यात अडसर ठरत असल्याने एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने केवळ पतीची हत्याच केली नाही तर त्याच्या मृतदेहाशेजारी राभत्रर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवला. मात्र, खूनी प्रियकरा पोलिसांपासून वाचू शकला नाही.
३० वर्षीय मृत तरूणाचा नाव राम दिनेश मीणा असं आहे. राम दिनेश मीणाची हत्या त्याच्या घरात घुसन करण्यात आली. पोलिसांना हत्येप्रकरणी आधी त्याच्या पत्नीवर संशय होता. जो नंतर खरा ठरला. महिलेने आधी आपल्या प्रियकरला घरी बोलवलं आणि आपल्या पतीची हत्या केली.
असं सांगितलं जात आहे की, पोलिसांना घरात एक तुटलेला मोबाइल सापडला. ज्याबाबत पोलिसांनी मृत तरूणाच्या पत्नीला विचारणा केली. पण तिने एकही बरोबर उत्तर दिलं नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्यानंतर पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली तेव्हा तिने सगळं खरं सांगितलं. नंतर महिलेने आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येची पूर्ण कहाणी सांगितली.
आरोपी महिला ज्योतिचे गावातीलच एक व्यक्ती चैन सिंह याच्यासोबत अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. चैन सिंहने ज्योतिला एक मोबाइल फोन दिला होता. ज्यावर ते नेहमीच बोलत होते. एक दिवस पतीने ज्योतिला मोबाइलवर बोलताना पाहिलं आणि रागात त्याने मोबाइल तोडला. त्यानंतर त्याने पत्नीला रागावलं. याच रागातून पत्नीने हे भयानक हत्याकांड घडवून आणलं.