Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कमीतकमी काळात व कमी खर्चात टोमॅटोचे फायदेशीर पीक म्हणून टोमॅटोकडे वळावे

जैन इरिगेशन व कागोमे कंपनीतर्फे आयोजित पीक परिसंवाद कार्यक्रमात मिलन चौधरी यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
January 22, 2022
in जळगाव
0
कमीतकमी काळात व कमी खर्चात टोमॅटोचे फायदेशीर पीक म्हणून टोमॅटोकडे वळावे
ADVERTISEMENT

Spread the love

शिरसोली, दि. 22 (प्रतिनिधी) – कमीतकमी काळात व कमी खर्चात टोमॅटोचे फायदेशीर पीक म्हणून टोमॅटोकडे वळावे. बाजारपेठेत ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास करून जैन इरिगेशनसारख्या उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आता काळाची गरज ठरली आहे. असे विचार कागोमे कंपनीचे भारतातील प्रमुख मीलन चौधरी यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि, जापान स्थित कागोमे फूडस् इंडिया यांच्या संयुक्तविद्यमाने ‘टोमॅटो-कांदा करार शेती व पीक परिसंवाद’ 22 जानेवारी 2022 रोजी आयोजला होता त्यात ते बोलत होते.

मेळाव्यात पूर्व मशागत, पांढरा कांदा, मिरची, टोमॅटो रोपांची लागवड पाणी व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, फर्टिगेशन, कीड-रोग व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ अनिल ढाके, गौतम देसर्डा, जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, कृषी पर्यवेक्षक शरद पाटील, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे,    डॉ. बी.के. यादव, पांढरा कांदा करार शेतीत सहभागी शेतकरी सुरेश अस्वार, श्रीराम पाटील, श्री गजानन ठिबकचे संचालक पी. के. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

जैन इरिगेशन व कोगोमे दोन्ही कंपन्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्य सुरू केले आहे. जैन इरिगेशन व कोगोमे कंपनी मिळून टॉमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यात येथील मातीवर येणाऱ्या टोमॅटो पिकावर खूप मोठे कार्य होणार आहे. शेतकऱ्यांना कोगोमे कंपनीने टोमॅटोची उच्च तंत्रज्ञानाने विकसित केलेली रोपे उपलब्ध करून दिली. त्याच बरोबर जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन व अॅग्रोनॉमिकल सपोर्ट, वेळोवेळी ग्रामसेवकांचे मार्गदर्शन यामुळे टोमॅटोमध्ये शेतकरी यशस्वी झालेले आहेत. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर ज्यांच्या शेतात हा कार्यक्रम होत आहे ते शेतकरी सुरेश अस्वार यांनी एकरी भरघोस टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्यांनी 12 टन टोमॅटो हार्वेस्ट केला व अजून शेतात 15 ते 20 टन टॉमॅटो काढायचा बाकी आहे. ही कमाल कागोमेची व्हरायटी व जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान यांची आहे असे कोगोमेचे चौधरी यांनी आवर्जून सांगितले.

पिकांची अवस्था, जमिनीच्या पोत व आवश्यकता नुसार पाणी व खतांचे काटेकोरपणे नियोजन आवश्यक आहे. मल्चींग खाली ठिबक सिंचन अवलंबणे कठीण असते. ड्रीपर तासाला किती लीटर पाणी देणारा असेल, जमीन कशी, पीक कोणते या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने विचार करणे त्यापद्धतीने नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. टोमॅटो अथवा भाजीपाला पिके अत्यंत संवेदनशील असतात ठिबक सिंचन व मल्चिंग यांचा सुयोग्य वापर करावा असे आवाहन करून ठिबक व मल्चिंगसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत डी. एम. बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच टोमॅटो व आले, हऴद पिकाची देखील लागवड करावी. जैन कंपनीने मसाले उत्पादन सुरू केले आहे त्यासाठी मिरची, हळद, आले यांची आवश्यकता असते. स्थानिक शेतकऱ्यांकडून माल उपलब्ध करून शेतकऱ्यांचे भले करण्याचे जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंचे तत्त्व पाळले जात आहे. शेतकऱ्यांसाठी कंपनीने मिरची, कांदा, टोमॅटो व आल्याचे रोपे उपलब्ध करून दिलेले आहेत याबाबत कंपनीचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सांगितले. शेतकऱ्यांना रोगमुक्त (डिसिज फ्री), बायोडिग्रेडीबल कपातील रोपे (टोमॅटो, मिरची, कांद्याची) खोक्यात कसे उपलब्ध केले जातात त्याबाबत प्रात्यक्षिक देखील शेतकऱ्यांना दाखविले गेले.

करार शेती व शेती व्यवस्थापन याबाबत जैन इरिगेशनचे पांढरा कांदा, टोमॅटो करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व काय करायला हवे याबाबत माती परीक्षण करून नेमकेपणाने खते, सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन करणे यावर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

ज्यांनी टोमॅटोची लागवड केली असे शिरसोलीचे प्रयोगशील सुरेश अस्वार, युनायटेड जेनेटिक्स प्रा. कंपनीचे व्यंकट पवार, जैन इरिगेशनचे रोशन शहा यांनी सुसंवाद साधला. विजेचा पंप मोबाईवरच नियंत्रीत करता येणारे पुणे येथील मोबाईल डिव्हाईसच उत्पादक सार्थक कंट्रोल्सचे संचालक रोहन टाटीया यांनी देखील त्यांच्या सार्थक मोबाईल ऑटो डिव्हाईसची सोदाहरण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पाटील यांनी तर आभारप्रदर्शन व्ही आर सोळंखी यांनी केले. या मेळाव्यास शिरसोली, जळके, विटनेर, नशिराबाद, पाचोरा पंचक्रोशीतील स्त्री-पुरुष शेतकरी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

Next Post

जळगाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ‘या’ पदासाठी भरती 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जळगाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ‘या’ पदासाठी भरती 

जळगाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे 'या' पदासाठी भरती 

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us