धुळे | धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूकीत भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धक्का देत सत्ता काबीज केली आहे. साक्री नगरपंचायतीत भाजपने 17 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.
साक्री नगरपंचायत निवडणुकीसाठी 21 डिसेंबर ला मतदान प्रक्रिया पार पाडली. 17 प्रभागासाठी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत दमदार विजय मिळवला. शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. तर 1 अपक्ष निवडून आला.
हे सुद्धा वाचा…
BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करताय? तर जाणून घ्या ‘हे’ ५ प्लॅन्स; कमी किमतीत मिळेल अमर्यादित डेटा
बोदवडमध्ये भाजपच्या विजय बडगुजरांना नशिबाची साथ, ईश्वरचिठ्ठीने मिळाला विजय
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
साक्री नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं युती केली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली यात भाजपने बाजी मारली