भुसावळ : शहरातील मिलिटरीच्या ११८ टीए बटालीयन परिसरातील बँक ऑफ बडोदा शाखेच्या स्ट्राँग रूमची भिंत फोडून तसेच स्ट्राँग रूमच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने दरोड्याचा प्रयत्न फसल्याने बँकेतील सुमारे ९ लाखांची रोकड सुरक्षित राहिली.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भुसावळ आयुध निर्माणीच्या पुढे भारतीय सैन्य दलाचे ११८ टीए मिल्ट्री बटालियन स्टेशन आहे. या स्टेशनच्या आतील भागात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. तेथे लष्करातील सैन्य कर्मचाऱ्यांची बँक खाती आहेत. आयुध निर्माणी व मिलिटरी स्टेशनमुळे हा संपूर्ण भाग प्रतिबंधात्मक क्षेत्रात येतो. मिलिटरी स्टेशनमध्ये तर २४ तास पहारा असतो. मात्र, सोमवारी मिलिटरी स्टेशनमधील बँक ऑफ बडोदाच्या स्ट्राँग रुमची भिंत फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे आढळले
याविषयी माहिती मिळताच जळगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. बँक व्यवस्थापक भूषण दत्तू येवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
हे सुद्धा वाचा…
बोगस कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देणे भोवले ; धुळ्यातील आरोग्याधिकारी निलंबित
शेगावच्या युवकाची भुसावळात आत्महत्या, कारण अस्पष्ट
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक
९ लाखांची रोकड सुरक्षित
बँकेला शनिवार आणि रविवारी दोन दिवस सुटी होती. याच काळात चोरट्यांनी बँकेच्या बंद असलेल्या शौचालयाला भगदाड करून स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला. स्ट्राँग रूमचे चॅनल गेटचे कुलूप अर्धवट कापण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांना आढळले. मात्र, चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने लॉकरमधील सुमारे ९ लाखांची रोकड सुरक्षित आढळली.