धुळे प्रतिनिधी | जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी लस न देता प्रमाणपत्र दिले जात आहे. अशातच बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय अन्य तिघा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला जाणार आहे.
बोगस कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरुन धुळे चांगलेच गाजते आहे. अारोग्य अधिकारीच या प्रकरणात सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागातील मोठा घोटा उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चौकशीत कोरोना प्रतिबंधक लस न घेताच ३ हजार २९९ जणांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले.
हे सुद्धा वाचा…
BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करताय? तर जाणून घ्या ‘हे’ ५ प्लॅन्स; कमी किमतीत मिळेल अमर्यादित डेटा
साऊथ सुपरस्टार धनुषने 18 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोबत घेतला घटस्फोट
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक
याप्रकरणी आयुक्त देविदास टेकाळे यांनी आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांना सोमवारी निलंबित केले. उर्वरित तिघे कर्मचारी कंत्राटी असल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचे पत्र शासनाच्या आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे. दरम्यान, आयुक्तांनी आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे डॉ. जे.सी. पाटील यांच्याकडे सोपवली आहेत.